जगभरात 30 लाखांहून अधिक कोरानाग्रस्त; तर 2 लाख 11 हजार जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची जगभरातील संख्या 30 लाख पार पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आजपर्यंत 30 लाख 64 हजार 225 एवढा झाला आहे. तर दोन लाख 11 हजार 537 लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत 9 लाख 22 हजार 387 लोक कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या आजाराच्या विळख्यातून बरे झाले आहेत.

कोरोनामुळे अमेरिकेत जगभरातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत एकट्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 32 टक्के रूग्ण आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अमेरिकेमध्ये 10 लाख 10 हजार 356 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनामुळे 56 हजार 797 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील एक लाख 38 हजार 990 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

सर्वाधिक कोरोना बाधितांची अमेरिकेनंतर संख्या स्पेनमध्ये आहे. स्पेनमधील दोन लाख 29 हजार 422 लोकांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 23 हजार 511 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेननंतर तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. इटलीमध्ये आतापर्यंत एक लाख 99 हजार 414 रूग्ण आहेत. तेथे आतापर्यंत 26 हजार 977 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात भारतात 1396 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा आता 28 हजार पार गेला आहे. आत्तापर्यंत 6 हजार 184 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Leave a Comment