या पठ्ठ्याने बनवली सोशल डिस्टेंसिंगसाठी ‘कोव्हिड-19’ बाईक

देशभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. हे संक्रमण पसरू नये यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जात आहे. लॉकडाऊनच्या रिकाम्या वेळेत अनेकजण आपली कला देखील दाखवत आहे. अशाच प्रकारे एका व्यक्तीने चक्क सोशल डिस्टेंसिंगचे पालन व्हावे यासाठी एक हटके बाईक तयार केली आहे.

त्रिपुराच्या पार्थ साहाने ही बाईक तयार केली आहे. त्याने एक इलेक्ट्रिक बाईक तयार केली असून, ज्यात सोशल डिस्टेसिंगचे पालन होते. या बाईकमध्ये दोन सीट एक मीटरचे अंतर सोडून आहेत.

पार्थने या बाईक कोव्हिड-19 असे नाव दिले आहे. पार्थने याचा व्हिडीओ देखील युट्यूबवर शेअर केला आहे.

त्याने सांगितले की, ही एक पेट्रोल बाईक असून, यासाठी एका बाईकला मॉडीफाय करण्यात आलेले आहे. सीटसाठी सायकलची सीट वापरली आहे. 80-वॉल्टची बॅटरी देण्यात आली असून, पेट्रोल इंजिनच्या जागी यात 750 वॉट डीसी मोटारचा वापर करण्यात आला आहे. या बाईकचे नाव कोव्हिड-19 ठेवले आहे.

ही बाईक फूल चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात. फूल चार्जमध्ये 80 किमी चालते. पार्थ एक युट्यूबर देखील असून, त्याआधी ते मॅकेनिक होते. टेक्निकल पार्थ नावाने त्याचा युट्यूब चॅनेल आहे. आपल्या 9 वर्षांच्या मुलीसाठी ही बाईक बनवली आहे. लॉकडाऊननंतर तिला शाळेत सोडण्यासाठी याच बाईकने जाणार आहे.

Leave a Comment