श्वसनाची समस्या असणाऱ्या लोकांसाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवला इंट्यूबेशन बॉक्स

श्वसनाची समस्या असणाऱ्या कोरोनाग्रस्तांसाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी कमी किंमतीचा इंट्यूबेशन बॉक्स बनवला आहे. याद्वारे श्वसन नळीत ट्यूब टाकून समस्येतून मुक्त करता येईल. इंट्यूबेशन तोंडाद्वारे प्लास्टिकच्या नळीला श्वसन नळीत पोहचवण्याच्या प्रक्रियेला म्हटले जाते.

गंभीर आजारात व्यक्तीला वेंटिलेटरवर ठेवल्यावर श्वसनाची समस्या येऊ नये म्हणून हे दिले जाते. आयआयटी गुवाहाटीतर्फे तयार करण्यात आलेले हे उपकरण एरोसॉल अँटी बॉक्स आहे, जे रुग्णाच्या डोक्याच्या बाजूने ठेवले जाते. यामुळे व्हायरस डॉक्टरांपर्यंत पोहचत नाहीत.

संशोधकांनुसार, उपकरणाचे सुरुवातीचे डिझाईन डीआरडीओमध्ये पुर्ण करण्यात आले आहे. या बॉक्सची एम्ससह अनेक मोठ्या केंद्रात समिक्षा केली जात आहे.

बायोसायन्स विभागाचे बीटेकचे विद्यार्थी उमंग माथूर यांनी सांगितले की, इंट्यूबेशन बॉक्सद्वारे रुग्णाच्या तोंडातून निघणाऱ्या एयरोसॉलपासून बचावास मदत मिळते. अन्य सुरक्षा उपकरणांच्या ऐवजी हा बॉक्स रुग्णांचा उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्ससाठी प्रभावी ठरत आहे.

Leave a Comment