कोरोनामुक्त झालेल्या कनिका कपूरचा प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय


कोरोनामुक्त झालेल्या कनिका कपूरने प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला असून कनिका कपूरला अलीकडेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याता आला आहे. प्लाझ्मा थेरपी कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आहे.

कनिका कपूरच्या रक्ताची तपासणी लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम करणार आहे. त्यानंतरच ती प्लाझ्मा डोनेट करु शकते का? ते स्पष्ट होईल. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. कनिका कपूरला डॉक्टरांनी परवानगी दिली तर २८ किंवा २९ एप्रिलला केजीएमयू रुग्णालयात प्लाझ्मा डोनेट करु शकेल. सहा एप्रिल रोजी लखनऊच्या पीजीआयएमएस रुग्णालयातून कनिका कपूरला डिस्चार्ज मिळाला. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर दोन आठवडे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. २० मार्च रोजी सर्वप्रथम तिला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. कोरोनाची लागण झालेली बॉलिवूडमधील ती पहिली सेलिब्रिटी आहे.

Leave a Comment