कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यासाठी जगभरात वापरले जात आहेत हे अ‍ॅप्स

जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसचा संसर्ग पसरू नये यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यासाठी मोबाईल अ‍ॅपची मदत घेतली जात आहे. भारत सरकारने देखील आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केला आहे. अशाच प्रकारे विविध देशात वेगवेगळे अ‍ॅप लाँच करण्यात आले असून, याविषयी जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलिया – येथे कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यासाठी कोव्हिडसेफ अ‍ॅपचा वापर केला जात आहे. हे ब्लूटूथच्या सिग्नलवर काम करते व कोरोनाग्रस्ताच्या 1.5 मीटर रेंजमध्ये येणाऱ्या सर्व लोकांना ट्रॅक करते.

चीन – चीनमध्ये कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जात आहे. क्यूआर कोडद्वारे लोकांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि आरोग्याविषयी माहिती जमा केली जात आहे. हे क्यूआर कोड बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर स्कॅन होतात. हे क्यूआर कोड वेगवेगळ्या रंगांचा असून, ग्रीन सिग्नल आल्यावरच नागरिकांना बाहेर जाण्याची परवानगी असते. क्यूआर कोड अ‍ॅपशी कनेक्ट आहे.

दक्षिण कोरिया – दक्षिण कोरियाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने कोव्हिड एसएमएस प्रणाली तयार केली आहे. जी एका मोबाईल अ‍ॅपद्वारे कंट्रोल होते. याशिवाय क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट रिस्टबँडचा वापर केला जात आहे.

भारत – सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केला असून, याद्वारे लोकांना कोरोनाबाबत माहिती मिळते. हे अ‍ॅप कोरोना संक्रमित भागात गेल्यावर अलर्ट करते. आतापर्यंत 7.5 कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

जर्मनी – जर्मनीने अखिल यूरोपीय प्रायव्हेसी प्रोटेक्टिंग प्रोक्सिमिटी ट्रेसिंगची मदत घेतली. मात्र याच्या प्रायव्हेसीवरून वाद झाल्यावर जर्मनीने अ‍ॅपल व गुगलची मदत घेतली. यामुळे युजर्सचा डाटा फोनमध्येच सेव्ह होईल व नंतर त्याची माहिती सरकारला मिळेल.

Leave a Comment