मुंबईत लपून बसलेल्या 11 परदेशी तबलिगींच्या आवळल्या मुसक्या


मुंबई : मुंबई पोलिसांनी मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथे लपून बसलेल्या 11 तबलिगींना अटक केली. धक्कादायक म्हणजे या 11 तबलिगींपैकी 1 जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. इंडोनेशियाचे तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य असून त्यात 6 महिलांचा समावेश आहे. सगळ्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथून तबलिगी जमातीच्या 11 सदस्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. एका खोलीत हे सगळे लपून बसले होते. या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये हे सगळे सहभागी झाले होते.

इंडोनेशियातील तबलिगी जमातचे सदस्य वांद्रे येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर 10 जणांना 20 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. सगळ्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना 22 एप्रिलला अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सगळ्यांना 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment