कोरोनामुक्त झालेले बोरिस जॉन्सन पुन्हा सेवेत रुजु

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ब्रिटनमध्ये परिस्थिती थोडीफार सुधारताना दिसत असून, रविवारी ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 413 जणांचा मृत्यू झाला आहे. ही मागील एप्रिल महिन्यात एका दिवसात मृत्यू झालेल्यांची सर्वात कमी संख्या आहे. यासोबत मृतांचा आकडा 20,732 वर पोहचला आहे. याआधी 31 मार्चला एका दिवसात सर्वाधिक कमी 381 जणांचा मृत्यू झाला होता.

याशिवाय ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे देखील कोरोनातून बरे झाले आहेत. ते आपले कार्यालय डॉउनिंग स्ट्रिट येथे लवकरच कामाला सुरूवात करतील. 12 एप्रिलला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर ते आपल्या घरी आराम करत होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे कार्यालयात परतले आहेत. याशिवाय लवकरात लवकर सोशल डिस्टेंसिंगच्या नियमात सुट द्यायची की नाही, याविषयी निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, ब्रिटनमध्ये 7 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

Leave a Comment