जाणून घ्या आयआयटी पदवीधर, ब्लॉगर, युट्यूबर ते आयपीएस अधिकारी विकास वैभव यांच्याविषयी

एखादी व्यक्ती ठरवले तर अनेक गोष्टी करू शकते. याचेच उदाहरण म्हणजे बिहारचे आयपीएस अधिकारी विकास वैभव. विकास वैभव हे युट्यूबर, ब्लॉगर अशा अनेक गोष्टींसाठी ओळखले जातात. सध्या ते आपल्या ब्लॉगमुळे विशेष चर्चेत आहेत.

आयपीएस विकास वैभव हे तेज तर्रार अधिकारी म्हणून ओळखले जातात. देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाविषयी त्यांचा ब्लॉग ‘Silent Pages : Travels in the Historical Land of India’ सध्या चर्चेत आहे. या ब्लॉगची सुरूवात त्यांनी 2013 मध्ये केली होती. या ब्लॉगमध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गोष्टींविषयी सविस्तर लिहिलेले असते, ज्याचा फायदा त्या विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो.

Image Credited – Aajtak

वैभव यांचा स्वतःचा युट्यूब चॅनेल देखील आहे. सिव्हिल सर्व्हिसेजमध्ये सहभाही होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांना गुरू कॉप नावाने देखील ओळखले जाते. त्यांच्या ‘ Vikas Vaibhav, IPS’ नावाच्या युट्यूब चॅनेलवर 2 लाख स्बस्क्रायबर्स आहेत.

Image Credited – Aajtak

त्यांनी आयआयटी कानपूरमधून पदवी घेतली असून, ते 2003 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते पोलीस हेडक्वार्टर, बिहारच्या एटीएस यूनिटमध्ये डिप्टी इंस्पेक्टर जनरल (डीआयजी) पदावर कार्यरत आहेत.

Image Credited – Aajtak

आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक डॉन, नेता अनंद सिंह यांसारख्या अनेकांना अटक केली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजेंसीमध्ये देखील ते कार्यरत होते. त्यांना ऐतिहासिक आणि पर्यावरण वारसाबाबत आधीपासूनच प्रेम आहे. त्यांना फोटोग्राफीची देखील आवड आहे.

Image Credited – Aajtak

आयपीएस वैभव म्हणाले की, पोलिसचा अर्ध केवळ बंदूक चालवणे, लोकांना पकडणे नाही. तर मानवता हित आणि बुद्धिमत्ताची रक्षा करणे व त्याला प्रोत्साहन देणे आहे. पोलिसांचे पद हे मानवी मुल्यांवर आधारित आहे, ज्यावर लोक विश्वास ठेवतात.

Image Credited – Aajtak

वर्ष 2007 मध्ये त्यांची नियुक्ती बिहारच्या पश्चिम चंबल येथे झाली होती. तेथे अधिक गुन्हे घडत असे. मात्र त्यांनी जंगलातील डाकंपासून हा भाग मुक्त केला.

Image Credited – Aajtak

ते म्हणाले की, मला प्रोफेशनपासून थोडा वेळ काढून युवकांसोबत वेळ घालवायला आवडते. यासह, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पुढे जाण्यासाठी न्याय आणि समानतेसह विकास करणे वेळेची आवश्यकचा आहे. त्यावर निःपक्षपातीपणे कार्य केले पाहिजे.

Leave a Comment