पंतप्रधान मोदींनी लाँच केली ‘कोव्हिड वॉरियर्स’ वेबसाईट

कोरोना व्हायरसचा प्रसार देशभरात वाढत असताना या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमात एक खास वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटला ‘कोव्हिड वॉरियर्स’ नाव देण्यात आलेले आहे.

या वेबसाईटद्वारे सामाजिक संघटना, स्थानिक प्रशासन आणि सिव्हिल सोसायटीचे कर्मचारी एकमेकांसोबत जोडलेले राहतील.

मोदी म्हणाले की, सरकारने या प्लॅटफॉर्मला देशवासियांसाठी तयार केले आहे. याच्याद्वारे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल.

या प्लॅटफॉर्मवर डॉक्टर, नर्स, आशा कर्मचारी, एनएसएस, आयुष विभागेच कर्मचारी, माजी सर्व्हिस अधिकारी, फार्मेसी कर्मचारी, लॅबचे कर्मचारी आणि एनसीसीची माहिती उपलब्ध असले. लोक या प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊन देशाची सेवा करू शकतील.

या वेबसाईटवर नागरिकांना कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती मिळेल. या प्लॅटफॉर्मवर सर्व राज्यांचा डेटा देखील उपलब्ध असेल. यावर सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती उपलब्ध असेल.

Leave a Comment