
मुंबई : चौकशी समितीसमोर गृहविभागाचे तत्कालीन विशेष प्रधान सचिन अमिताभ गुप्ता यांनी स्वत:च वाधवान कुटुंबीयांना ल़ॉकडाऊनदरम्यान प्रवासासाठीचे विशेष परवानगी पत्र दिल्याचा मोठा खुलासा झाला आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर नसून या गोष्टीचे विनाकारण राजकारण केले जात असल्याचे मत समितीने मांडले.
अमिताभ गुप्तांनीच दिले वाधवान प्रकरणातील ‘ते’ पत्र
अमिताभ गुप्ता यांची चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवालही प्राप्त झाला आहे. लवकरच जो सार्वजनिक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान, सीबीआयच्या स्वाधीन वाधवान कुटुंबाला करण्यात आले असून, मुंबईला त्यांना आणण्यात आले आहे.
लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबाने केलेल्या प्रवास प्रकरणानंतर यावर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात आले. पण, याबाबत विनाकारण राजकारण केले गेले असून, आपले ते कौटुंबिक मित्र असल्याचे गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर सांगितले. त्याचबरोबर कोणताही राजकीय दबाव आपल्यावर नसल्याची बाबही त्यांनी चौकशी समिती समोर ठेवली.
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार ते पत्र खुद्द अमिताभ गुप्ता यांनीच दिल्याची कबुली दिली आहे. या अहवालाची फाईल तयार होऊन ती मुख्यमंत्र्यांसमोर लवकरच सादर करण्यात येणार असून, चौकशीचा हा अहवाल येत्या काळात सार्वजनिक करण्यात येणार आहे.
