मुंबईकरांच्या चिंतेत भर! सहा वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त


मुंबई : काल राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 440 नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 8068 वर पोहचली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मायानगरी मुंबई शहरातील आहेत. पाच हजाराहून जास्त मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या आहे. सध्याच्या घडीला मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 5407 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर, 204 रुग्णांचा यात बळी गेला आहे.

मुंबईकरांच्या चिंतेचा विषय म्हणजे मुंबईतील 6 वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत. चार वार्डमध्ये 200 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 100 रुग्ण असलेले सात वार्ड आहेत. हे सर्व वार्ड पूर्णपणे सील करण्यात आले आहेत.

मुंबईत दररोज वाढणारे आकडे हे सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. कारण, मुंबईतील 6 वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद आहे. 4 वॉर्डमध्ये 200 हून अधिक रुग्ण तर, 100 रुग्ण असलेले 7 वॉर्ड आहेत. त्यामुळे 100 पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये आणखी दोन वॉर्डची भर पडली आहे. पालिका क्षेत्रात 100 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या एकूण वॉर्डची संख्या 15 झाली आहे, जी शनिवारपर्यंत 13 होती, तर मुंबईतील 8 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतील वॉर्डनुसार रुग्णसंख्या

Leave a Comment