केस कापायला गेले आणि कोरोना घेऊन माघारी परतले


भोपाळ : देशावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ केली. त्यातच शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये थोडीशी ढील दिली आहे. पण अद्याप मद्यविक्री, मॉल्स आणि सलूनवर लादलेले निर्बंध कायम आहेत. असे असतानाही मध्य प्रदेशमधील खरगौन जिल्हयातील सलूनमध्ये केस कापायला गेलेल्या ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील वृत्त झी 24 तासने दिले आहे.

संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाला या सलूनमधून कोरोना व्हायरस पसरल्याची माहिती मिळताच खूप मोठा गोंधळ उडाला आहे. हे सलून तात्काळ बंद करण्यात आले आहे. या ९ लोकांना सलूनमधून कोरोनाची लागण झाल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या ही ६० पार पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या २ महिन्यात एकूण २० नवे रूग्ण आढळले आहेत. तसेच जिल्ह्यातील ६ लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच सकाळी आणखी तिघांची रिपोर्ट निगेटिव्ह आली असून यामध्ये ३ वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. खरगौनच्या सीएमएचओ डॉ दिव्येश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्ती बडगावमध्ये आली होती.

Leave a Comment