48 इंच छाती, 19 इंच बायसेप; या खऱ्या आयुष्यातील ‘सिंघम’कडून कैदी देखील घेतात फिटनेस टिप्स

बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपण चुलबूल पांडे, सिंघम आणि सिम्बा अशा अनेक रुपात अभिनेत्यांना पोलिसांची भूमिका साकारताना पाहिली आहे. स्टायलिश लूक, बॉडी अशी पोलिसांची एक प्रतिमा हे चित्रपट पाहून आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. वेळेनुसार, खऱ्या आयुष्यात देखील पोलिसांची प्रतिमा आता बदलत चालली आहे. सध्या कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी देखील आपल्या फिटनेसकडे, लूककडे विशेष लक्ष देताना दिसतात. असेच एक उदाहरण म्हणजे तिहार कारागृहाचे जेलर दीपक शर्मा.

दीपक शर्मा यांनी 2014 साली फिटनेसला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवले व तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. 48 इंच छाती आणि 19 इंच बायसेप असलेले दीपक शर्मा आपल्या कामासोबतच शरीराची देखील विशेष काळजी घेतात.

https://www.instagram.com/p/B9UehMMB4Bi/?utm_source=ig_web_copy_link

कारागृहात त्यांना अनेक मुख्य कामे देण्यात आलेली आहेत. याशिवाय निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी त्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती.

दिल्लीमध्ये दीपक शर्मा हे नाव चांगलेच परिचयाचे आहे. आपल्या विभागसह मिळून ते कैद्यांसाठी योगा आणि व्यायामाचे क्लासेस देखील घेत असतात.

https://www.instagram.com/p/BhERLK0n74j/?utm_source=ig_web_copy_link

आपल्या या फिटनेसची प्रेरणा त्यांना सलमान खानच्या दबंग चित्रपटापासून मिळाली असेही ते सांगतात. त्यांनी, मिस्टर यूपी, मिस्टर दिल्ली, आयर्न मॅन ऑफ दिल्ली (सिल्वर), स्टिल मॅन ऑफ इंडिया (सिल्वर) असे अनेक किताब जिंकले आहेत.

त्यांच्यामुळे विभागात देखील फिटनेसप्रती जागृकता निर्माण झाली आहे. एवढेच नाहीतर कैदी देखील त्यांना वर्कआउट आणि डायटबद्दल विचारतात.

https://www.instagram.com/p/BhER-L7HOtN/?utm_source=ig_web_copy_link

त्यांनी सांगितले की, जेव्हा मी बॉडीबिल्डिंग सुरू केले, त्यावेळी माझे वय 60 किलो होते. मी वजन वाढवण्यास सुरूवात केली आणि 118 किलोपर्यंत वाढवले. आता माझे वय 90 किलो आहे.

शर्मा यांनी सांगितले की, दररोज मी सकाळी 7 वाजता उठतो आणि 4-5 तास व्यायाम करतो. याशिवाय दिवसाला 6 ते 7 वेळा आहार घेतो. घरचे सर्व शाकाहारी असल्याने मी स्वतः सकाळी अंडी, चिकन आणि मासे या गोष्टी तयार करतो.

Leave a Comment