गरीबांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दोन भावांनी 25 लाखाला विकली आपली जमीन


कोलार: कर्नाटकातील कोलार येथे राहणार्‍या आणि पेश्याने व्यावसायिक असलेल्या दोन भावांनी ज्या प्रकारे गरिबांना मदत करण्याचा मार्ग शोधला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या दोन मुस्लिम बांधवांनी गरिबांच्या मदतीसाठी 25 लाखाला आपली जमीन विकली जेणेकरून अधिकाधिक गरीब आणि भुकेलेल्या लोकांना मदत करू शकतील. एवढेच नव्हे तर आजूबाजूचे लोक आणि त्यांचे मित्रदेखील त्यांना या कामात मदत करीत आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर या दोन भावांशी बोलताना ते म्हणाले, लहानपणीच त्यांनी त्यांचे आईवडील गमावले होते आणि वयाच्या 5 व्या वर्षी ते कोलारमध्ये राहायला आले, तेव्हा हिंदू, शीख आणि मुस्लिम सर्वांनी त्यांना आसरा दिला. ते त्यांच्या पायावर उभे राहत नाहीत तोपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याची देखील सोय केली. अशा कठीण काळात गरजूंना मदत करण्यासाठी त्यांनी त्यांची जमीन विकली.

दोन्ही बंधू म्हणाले, लॉकडाउन संपल्यानंतर ते निबंधक कार्यालयात जाऊन जागेसंदर्भातील बाकी औपचारिकता पूर्ण करतील. आत्तापर्यंत दोन्ही भावांनी 3000 कुटूंबांना खाण्यापिण्याच्या आवश्यक वस्तूंची मदत केली आहे. त्याच वेळी, कोलार प्रशासनाने त्यांना मदत करण्यासाठी पास जारी केले आहेत, जेणेकरुन संकटाच्या काळात ते गरीब लोकांना मदत करु शकतील.

Leave a Comment