दिल्ली पाठोपाठ आणखी पाच राज्य लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत


नवी दिल्ली – दिल्ली सरकारचे म्हणणे आहे की त्यांना आपल्या राज्यात लॉकडाउन 16 मे पर्यंत वाढवायचे आहे. त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा या पाच राज्यांनी 3 मेनंतर आपापल्या राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यात हॉटस्पॉट भागात कोणतीही सवलत मिळणार नाही. या संदर्भातील वृत्त अमर उजालाने दिले आहे.

त्याशिवाय गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक ही इतर सहा राज्ये केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करतील असे म्हणत आहेत. दुसरीकडे, आसाम, केरळ आणि बिहार यांचे म्हणणे आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर सोमवारी हा निर्णय घेतील.

तेलंगणा हे एकमेव राज्य आहे ज्याने लॉकडाउन कालावधी 7 मे पर्यंत वाढविला आहे. या कालावधीच्या समाप्तीच्या दोन दिवस आधी तो पुढील निर्णय घेईल. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई आणि पुण्याच्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन वाढविला आहे.

ते म्हणाले, “सोमवारी पंतप्रधानांसह व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या लॉकडाऊनवर अधिक चर्चा होईल. आवश्यक असल्यास, लॉकडाउन 3 मे नंतर आणखी 15 दिवस वाढविला जाईल. संपूर्ण मुंबई व पुणेपुरताच नसेल तर कंटेनमेंट झोनमध्ये देखील वाढवता येईल.

देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या आहे. येथे, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, आजूबाजूच्या परिसरातील दुकाने उघडण्यास परवानगी नाही. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारदेखील दुकाने उघडण्याआधी वाट पाहत आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता उत्तरप्रदेशसाठी संकटाची वेळ आली आहे. किराणा सामान, औषधे आणि 11 प्रकारच्या उद्योगांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी असलेल्या दुकानांना सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. या ठिकाणी आम्ही इतर आणखी दुकाने उघडू देणार नाही.

Leave a Comment