कोरोनाचे मृत्युतांडव…जगभरात कोरोनामुळे दोन लाखांपेक्षा जास्त बळी


मुंबई : जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाखांच्या वर पोहोचली आहे. आतापर्यंत जगभरात 2 लाख 3 हजार 269 लोकांचा जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच 29 लाख 20 हजारांवर कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या पोहोचली आहे. जगभरात 8 लाख 36 हजार रुग्ण बरे झाले आहेत. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात 90,731 नवीन कोरोनाग्रस्त जगभरात सापडले आहेत. तर जगात मागील 24 तासात कोरोनामुळे 6,069 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. सध्या 18,23,074 लोक माइल्ड तर 57864 लोक कोरोनामुळे सिरीयस तसेच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत.

जगात अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे असे पाच देश आहेत, जिथे कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 50 हजारांहून अधिक बळी गेले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची ब्रिटनमधील संख्या 20 हजारांवर गेली आहे. तर मागील 24 तासांमध्ये ब्रिटनमध्ये 4,913 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर 813 लोकांचा तेथे मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1 लाख 48 हजार 377 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 9,60,896 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 54 हजार पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनामुळे 22,902 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,23,759 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 26,384 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 195,351 एवढा आहे.

जगभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी खालील प्रमाणे

Leave a Comment