सिंगापूरमधील युनिव्हर्सिटीचा दावा; 20 मेपर्यंत भारतातून नष्ट होईल कोरोनाचा संसर्ग


नवी दिल्ली : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून जगभरातील 29 लाखाहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. भारतातील कोरोनाचा संसर्ग 20 मेपर्यंत नष्ट होईल असा दावा सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइनने (SUTD) केला आहे. हा दावा आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने आकडेवारीचे जे विश्लेषण केल्यानंतर करण्यात आला आहे. 20 मेपर्यंत भारतातून कोरोना नष्ट नाश होईल तर या व्हायरसचा वेगवेगळ्या देशांमध्ये लवकरच नाश होईल असे सांगण्यात आले आहे.

याआधी शुक्रवारी सरकारकडून 16 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला तर कोरोनाचे रुग्ण आढळणार नाहीत असे सांगण्यात आले आहे. असे केल्याने भारत लवकर कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवू शकेल असा दावा करण्यात आला आहे. देशभरातील लॉकडाऊन कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. गृहमंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री उशिरा अत्यावश्यक सेवांसह काही दुकाने उघडण्याची परवानगी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये देण्यात आली आहे. कॅन्टोनमेंट झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्रात दुकाने उघडण्यास परवानगी नाही. याशिवाय दारूची दुकाने आणि मॉलची दुकानेही उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.

Leave a Comment