रामदेव बाबांचा दावा, एक मिनिट श्वास रोखून धरल्यास होणार नाही कोरोना


नवी दिल्ली – आज तक वाहिनीवरील ई-अजेंडा या कार्यक्रमाच्या विशेष सत्रामध्ये बोलताना योगगुरु रामदेव बाबा यांनी कोणतीही व्यक्ती जर एक मिनिट श्वास रोखून धरत असेल तर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही असा त्याचा अर्थ होतो, असा दावा केला आहे. बाबा रामदेव यांनी यावेळी कोरोना व्हायरससाठी विशेष प्राणायाम असून त्याला उज्जायी म्हटले जाते, असे सांगितले.

उज्जायी प्राणायाम करुन पहाणे ही एकप्रकारे कोरोना व्हायरसची सेल्फ टेस्टिंग असल्याचे त्यांनी सांगितले. हायपरटेंशन, ह्दयाचा आजार, डायबिटीस ज्या व्यक्तींना आहे, त्यांनी ३० सेकंदासाठी आणि तरुणांनी एक मिनिटासाठी श्वास रोखून धरला तर याचा अर्थ तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. हा प्रयोग तुम्ही करुन बघू शकता, असे रामदेव बाबा म्हणाले. त्याचबरोबर रामदेव बाबांनी, तुमच्या नाकपुडयांमध्ये जर तुम्ही राईचे तेल टाकले तर कोरोना व्हायरस वाहून खाली तुमच्या पोटामध्ये जाईल. तिथे असणाऱ्या अॅसिडमुळे त्याचा मृत्यू होईल, असा दावा केला.

Leave a Comment