क्रिकेट मंडळांचा एकमुखी निर्णय; जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा नाही


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून जगभरातील कोरोनाग्रस्तांचे आकडे देखील अव्वाक करणारे आहेत. त्यातच आज जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 27,34,102 झाली असून त्यापैकी 1,91,189 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 7,51,408 रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या या वाढत्या संकटामुळे जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली. त्याचबरोबर भारतातील प्रसिद्ध अशी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे आणि ती कधी होईल, हे निश्चित सांगता येत नाही. त्यातच आता जगभरातील क्रिकेट मंडळांनी एकमुखी निर्णय घेत 1 जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा न खेळवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांना आणखी बराच काळ प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.

29 मार्चपासून आयपीएलचा 13 वा हंगाम सुरु होणार होता. पण परंतु तो 14 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आला होता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढील सुचना मिळेपर्यंत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यातच कोरोनाचा वाढत्या प्रकोपामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवरही कोरोनाची टांगती तलवार आहे.

शुक्रवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला. 1 जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा निर्णय सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर घेतला गेल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले की, इंग्लंड आणि वेल्समध्ये 1 जुलैपर्यंत कोणतेच व्यावसायिक क्रिकेट सामने होणार नाहीत. या कालावधीपर्यंत कौंटी चॅम्पियनशीपच्या सत्रातील 9 सामने रद्द होतील, पण ते सामने सुधारीत वेळापत्रकानुसार खेळवले जातील. जूनमध्ये होणारी Vitality Blast स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवले जातील. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका आणि भारतीय महिला संघाविरुद्धची मालिकांच्या वेळापत्रकात बदल होईल.

Leave a Comment