कोरोना वॉरियर्सच्या सन्मानार्थ अक्षय कुमार बनविले ‘तेरी मिट्टी’ गाण्याचे हे खास व्हर्जन

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र या महामारीवर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस असे अनेकजण दिवस-रात्र काम करत आहे. अशा कोरोना यौद्ध्यांसाठी ‘केसरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे नवीन व्हर्जन रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्यामध्ये कोरोनाविरुद्धच्या लढ्यात न झोपता दिवस-रात्र काम करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, ड्रायव्हर्स व अन्य लोकांची झलक पाहण्यास मिळत आहे. जे सीमेवर उभे राहून आपली रक्षा करत होते, ते आता पांढऱ्या गणवेशात आपल्यासाठी उभे असल्याचे या गाण्यातून सांगितले आहे.

गाण्याचे बोल देखील ‘सरहद पे जो वर्दी खाकी थी, अब उसका रंग सफेद हुआ’ असे आहेत.

व्हिडीओमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यापासून ते अनेक वेगवेगळ्या गोष्टींची झलक पाहण्यास मिळत आहे.

गाण्याच्या शेवटी अक्षय कुमार डॉक्टरांचे आभार मानत म्हणतो की, आतापर्यंत आपण ऐकले आहे की डॉक्टर हे देवाचे रुप असतात. मात्र आता असे वाटते की देव स्वतः डॉक्टरांच्या रुपात आला आहे.

हे गाणे अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ गाण्यापासून प्रेरित आहे. हे गाणए बी प्राकने गायले असून, गीत मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहे.

Leave a Comment