सुर्यप्रकाशात नष्ट होतो कोरोना, अमेरिकन वैज्ञानिकांचा दावा

सुर्यप्रकाशात कोरोना व्हायरस लवकर नष्ट होत असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र या संबंधीचे संशोधन अद्याप पब्लिश करण्यात आले असून, बाह्य मुल्यांकन अद्याप बाकी आहे.

होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन म्हणाले की, वैज्ञानिकांना आढळले की अल्ट्राव्हायोलेट किरणांचा व्हायरसवर मोठा परिणाम होता. त्यामुळे उन्हाळ्यात व्हायरसचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

त्यांनी सांगितले की, आतापर्यंतचे आमचे निरिक्षण आहे की सुर्यप्रकाशामुळे कोरोना व्हायरस पृष्ठभाग आणि हवेत देखील नष्ट होतो. तापमान आणि आर्द्रतामध्ये व्हायरसवर समान प्रभाव होताना पाहण्यास मिळाला. अधिक तापमान आणि आर्द्रता हे व्हायरसवर परिणामकारक आहेत.

मात्र अद्याप संशोधन सार्वजनिक झाले नसल्याने इतर तज्ञ त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. अल्ट्रावायलेट किरणांचा व्हायरसवर परिणाम होतो, हे आधीपासूनच स्पष्ट झालेले आहे.

त्यामुळे मुख्य प्रश्न असा आहे की प्रयोगात वापरण्यात आलेली यूव्ही लाईटची तीव्रता आणि वेवलेंथ किती होती आणि ती नैसर्गिक सुर्यप्रकाशाशी साधर्म्य ठेवते का ?

मेरीलँड मधील नॅशनल बायोडेफेंस अ‍ॅनालिसिस अँड काउंटरमेजर्स सेंटरमध्ये प्रयोग कसा करण्यात आला ते दाखवण्यात आले.यानुसार, ठोस पृष्ठभागावर 21 ते 24 डिग्री सेल्सियस तापमान आणि 20 टक्के आर्द्रता असताना व्हायरस अर्धे आयुष्य म्हणजे केवळ 18 तास जिंवत होता. मात्र आर्द्रता 80 टक्क्यांपर्यंत वाढवल्यावर आणि 2 मिनिटे सुर्यप्रकाशात व्हायरसचे जीवन हे 6 तासांनी कमी झाले. याशिवाय तापमान 70 ते 75 डिग्री आणि आर्द्रता 20 टक्के असताना हवेत व्हायरसचे अर्धे जीवन 1 तासांचे होते.

Leave a Comment