कोरोनाग्रस्तांवर प्लाज्मा थेरेपीचे परिणाम चांगले – केजरीवाल

दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर करण्यात आलेल्या प्लाज्मा थेरेपीबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोकनायक जय प्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये 4 रुग्णांवर प्लाज्मा थेरेपीची चाचणी करण्यात आली. याचे परिणाम उत्साहजनक आहेत.

त्यांनी सांगितले की, मागील आठवड्यात सर्वात गंभीर रुग्णांवर प्लाज्मा थेरेपी करण्याची केंद्राकडून परवानगी मिळाली होती. यातील 4 रुग्णांवर याचे ट्रायल करण्यात आले असून, आतापर्यंत परिणाम चांगले आले आहेत.

यकृत व पित्त विज्ञान संस्थेचे (एलबीएस) संचालक डॉ. एसके सरीन यांनी देखील प्लाज्मा थेरेपीबाबत उत्साह व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही खूप विचारपुर्वक प्लाज्मा थेरेपीचे ट्रायल सुरू केले आहेत. 4 रुग्णांवर चांगले परिणाम पाहण्यास मिळाले असून, आणखी 3 रुग्णांवर ट्रायल केले जाणार आहे.

सरीन यांनी सांगितले की, जर सुरुवातीचे 10 रुग्ण बरे झाल्यास आपल्याला एक लीड मिळू शकते. या थेरेपीचे अनेक फायदे आहे. कोरोनामधून बरे झालेले रुग्ण प्लाज्मा देतील तेव्हाच ही थेरेपी पुढे जाऊ शकेल. डोनरची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे.

Leave a Comment