आयआयटी दिल्लीने बनविले सर्वात स्वस्त टेस्टिंग किट, मिळाली आयसीएमआरची मंजूरी

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी दिल्लीने अगदी स्वस्तातील कोव्हिड-19 चाचणी किट बनवली आहे. या किटला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (आयसीएमआर) मंजूरी देखील मिळाली आहे. ही किट अवघ्या शेकडो रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

आयआयटी दिल्ली या किटच्या निर्मितीसाठी इंडस्ट्रियल भागीदाराच्या शोधात असून, या आठवड्यात याच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आयसीएमआरकडून किटची 100 टक्के चाचणी करण्यात आली आहे. आयआयटी दिल्ली ही पहिली अशी शैक्षणिक संस्था आहे, जिला पॉलीमराइज  चेन रिएक्शनवर (पीसीआर) आधारित चाचणी पद्धतीसाठी आयसीएमआरकडून परवानगी मिळाली आहे.

आयआयटी दिल्लीच्या 10 सदस्यांच्या टीमने कोव्हिड-19 च्या जिनोममधील वेगळे आरएनएम शोधले. हे आरएनएम इतर मनुष्यांच्या कोरोना व्हायरसमध्ये नाहीत. यामुळे कोरोना व्हायरसची लागण झाले की नाही, हे समजण्यास मदत होते.

Leave a Comment