कोरोनावरील लसीमुळे हार्वर्डचे प्राध्यापक झाले अब्जाधीश

हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक टिमोथी स्प्रिंगर हे  कोरोना व्हायरसवरील लस शोधणार्‍या मोडेर्ना या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर आज अब्जाधीश झाले आहे. कंपनीने गुंतवणूकीवर 17,000 टक्के परतावा देणार आहे.

अब्जाधीश होण्याआधी आपल्याकडे भरपूर काही आहे, असा प्राध्यपकांना विश्वास आहे. 2018 साली माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, माझ्याकडे पुरेशा प्रमाणात संपत्ती आहे, त्यामुळे अधिकची गरज नाही.

कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचा प्रयत्न करणारी कंपनी मोडेर्नाच्या शेअर्सची किंमत 51 डॉलर्सनी वाढली आहे. कंपनी 6 महिन्यांपूर्वी प्रति शेअर 17 डॉलरवर ट्रेडिंग करीत होती. आकडेवारीनुसार कंपनीची शेअर किंमतच वाढली नाही तर स्प्रिंगर यांची एकूण मालमत्ता 1 बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक वाढली आहे.

मोडेर्ना ही मोजक्या कंपन्यांपैकी आहे, ज्यांनी कोरोना व्हायरसचा लस mRNA-1273 ची चाचणी करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाकडून कंपनीला तब्बल 400 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत. सध्या 70 लसींवर काम सुरू आहे.

याआधी प्राध्यापक स्प्रिंगरच्या संपत्तीमध्ये 1999 साली वाढ झाली होती. त्यावेळी त्यांनी त्यांची पहिली कंपनी ल्युकोसाइटला मिलेनियम फार्मास्युटिकल्सला तब्बल 635 मिलियन डॉलर्सला विकले होते. याद्वारे त्यांना तब्बल 100 मिलियन डॉलर्सचा नफा झाला होता.

त्यानंतर स्प्रिंगर हे विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांनी मोडेर्नामध्ये 5 मिलियन डॉलर्सला 17.3 मिलियन शेअर्स विकत घेतले होते. त्या शेअर्सची किंमत सध्या 800 मिलियन डॉलर्स आहे. मोडेर्ना व्यतिरिक्त प्राध्यपकांनी सेलेक्टा बायोसायन्स आणि इडिटास मेडिसनमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. याशिवाय ते मोर्फिक थेरॅपीओटिक्स आणि स्कॉलर रॉक होल्डिंगचे संस्थापक आहेत.

Leave a Comment