उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यात वाटले जात आहेत चक्क कुटुंब नियोजनाचे किट्स


बलिया – या वर्षाच्या सुरुवातीलाच चीनच्या वुहानमधून उगम झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील बहुतांश देशांमध्ये थैमान घातल्यामुळे प्रत्येक देशांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. त्याला आपला देशदेखील अपवाद नाही आहे. गेल्या ३ आठवड्यांपासून भारतातही लॉकडाऊन सुरु आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आजमितीस २१ हजारांच्या वर पोहचला असून ७०० पेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

तसेच लोकांना लॉकडाऊन काळात सक्तीने घरी राहण्यास भाग पडत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार विनाकारण घराबाहेर पडू नका असे सांगण्यात येत आहे. जर अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडला तर पोलिसांकडून येथेच्छ धुलाईनंतर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहे. लोकांमध्ये कोरोनामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेचे लॉकडाऊनमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. अशा स्थितीत आणखी एका गोष्टीची चिंता सरकारला सारखी डिवचत आहे.

सरकारच्या चिंतेचा भारताची लोकसंख्या हा विषय आहे. ही समस्या लॉकडाऊन काळात आणखी वाढू नये म्हणून सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशमधील बलिया येथील आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन मोफत निरोधचे वाटप करण्यात येत आहे.

लोकांनी कुटुंबनियोजन करावे यासाठी घरोघरी निरोध वाटप करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्यामुळे घरोघरी आरोग्य विभागाचे कर्मचारी निरोध, माला-डी और कॉपर टी अशा विविध किट्सचे मोफत वाटप करत आहे. लॉकडाऊन दरम्यान वाढणारी लोकसंख्या सरकारसाठी अडचणीची ठरणार आहे. हे अभियान त्यासाठी चालवले जात आहे. प्रत्येक गावोगावी, शहरात आशासेविका लोकांमध्ये जनजागरुकता करण्यासाठी जात आहेत.

याबाबत माहिती देताना असिस्टेंट सीएमओ डॉ. वीरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, घरात लॉकडाऊनमुळे बंदिस्त असणाऱ्या जोडप्यांना एकमेकांना देण्यासाठी खूप वेळ मिळाला असल्यामुळे सरकारदेखील या वेळेमुळे त्रस्त आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक घरात कुटुंब नियोजनाचे किट्स वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment