अमेरिका कोरोनावरील लस शोधण्याच्या अगदी जवळ, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती


वॉशिंग्टन – महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे अक्षरशः थैमान सुरु असले तरी देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित असल्याचे सांगत देशातील उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. याआधी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस अमेरिकेच्या अर्थवयवस्थेवर करण्यात आलेला हल्ला असल्याचे सांगत चीनवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. कोरोनामुळे अमेरिकेतील ५० हजाराहून जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आठ लाखांहून अनेकांना लागण झाली आहे.

दरम्यान अमेरिका कोरोनावरील लस शोधण्याच्या अगदी जवळ असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. लसची चाचणी करण्याच्या आम्ही अगदी जवळ आहोत. चाचणी जेव्हा सुरु होते तेव्हा त्यासाठी बराच वेळ लागतो. पण आम्ही हे लवकरच पूर्ण करु, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. यावेळी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि व्हाइट हाऊसचे कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे समन्वयक डेबोरा बीरेक्सही उपस्थित होते.

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका, जर्मनी, युके आणि चीनमधील लस लक्ष ठेवल्यानंतर आम्ही एका लसीच्या जवळ पोहोचलो आहोत. लस शोधून त्यावर काम करण्यासाठी आमच्याकडे अनेक हुशार लोक आहेत. पण दुर्दैवाने आम्ही अद्याप चाचणीच्या अगदी जवळ पोहोचलेलो नाही. कारण जेव्हा चाचणी सुरु होईल तेव्हा त्यासाठी वेळ लागतो. पण आम्ही ते वेळेत पूर्ण करु, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment