कोरोना फायटर्सच्या मदतीला धावून आली देसी गर्ल


संपूर्ण जगभरासह आपल्या देशात देखील कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले असून अनेक सेलिब्रिटी कोरोना विरूद्धच्या लढाईत आपापल्या परीने मदत करत आहेत. त्यातच बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्राने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना फायटर्सच्या मदतीसाठी प्रियंकाने तब्बल 20 हजार शूज देण्याची घोषणा केली आहे.

भारतात कोरोनाशी लढा देणाऱ्या हेल्थ वर्कर्सना प्रियंका चोप्रा 10,000 जोडी शूज देणार आहे. तर याव्यतिरिक्त 10,000 जोडी शूज लॉस एन्जेलिसमध्येही दान करणार आहे. क्रॉक्स कंपनीसोबत यासाठी प्रियंकाने हात मिळवणी करत केरळ, महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकातील सार्वजनिक, तसेच शायकीय रूग्णालयांमध्ये हे शूज दान करणार आहे.

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून याबाबतची माहिती प्रियंका चोप्रा-जोनासने दिली. प्रियंका म्हणाली की, 20 हजार पैकी 10 हजार शूज ती लॉस एंजेलिस येथील वैद्यकिय कर्मचाऱ्यांना वाटणार आहे. तर उर्वरित 10 हजार भारतातील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार आहे. याशिवाय जगभरातील महिला वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी तिने 76 लाख रुपयांचा निधीही जाहीर केला आहे.

प्रियंका चोप्रा पुढे म्हणाली की, संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचे संकट आले असताना. त्याच्याशी दोन हात करणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी खरे सुपरहिरो आहेत. ते आपल्या सुरक्षेसाठी दररोज काम करत असून आपल्यासाठीच ते जीवघेण्या कोरोनासोबत लढा देत आहेत. आपण देखील त्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलायला हवा.

Leave a Comment