अमेरिकेत कोरोनाचे मृत्युतांडव ; गेल्या 24 तासात 3,176 मृत्यू


न्यूयॉर्क – जगात महासत्ता अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेत जीवघेण्या कोरोना व्हायरसचा अक्षरशः मृत्युतांडव सुरु आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत रेकॉर्ड 3,176 लोकांचा मृत्यू झाला असून तेथील मृतांचा आकडा 50 हजार पार पोहोचला असून याबाबतची माहिती एएफपीच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा देखील 9 लाखांहुन अधिक झाला आहे.

कोरोनामुळे मृतांचा आकडा अमेरिकेसह इटली, स्पेन, फ्रांस, ब्रिटन, इराण आणि तुर्की या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांचा जगात आकडा 27 लाखांपार गेला असून मृतांची संख्या 1 लाख 65 हजारांहून अधिक झाली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचे विनाशक रूप अजून दिसायचे असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्यामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे.

Leave a Comment