सौदी अरेबियातील ११ भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू


नवी दिल्ली – सौदी अरेबियात ११ भारतीयांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती सौदीतील भारतीय दुतावासाने दिली असून चार रुग्णांचा मदिना येथे, तीन रुग्णांचा मृत्यू मक्का येथे, दोन रुग्णांचा मृत्यू जेद्दाह येथे, एका रुग्णाचा मृत्यू रियाधमध्ये तर एका रुग्णाचा मृत्यू दमाम या ठिकाणी मृत्यू झाला. यासंदर्भातील एक पत्रक काढण्यात आले असून ही माहिती त्यामध्ये देण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान जगभरात कोरानाने अक्षरशः मृत्युतांडव सुरु केले असून कोरोना व्हायरसमुळे जगभरात बळी पडलेल्यांचा आकडा 1 लाख 91 हजारांवर गेला आहे. तर आतापर्यंत जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 27 लाख 18 हजारांच्या घराच पोहचला आहे. त्याचबरोबर जगभरातील सात लाख 46 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे, तर अजून जवळपास 17 लाख 81 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील तीन टक्के म्हणजे 58 हजार 690 बाधित गंभीर आहेत. अमेरिकेमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे सर्वाधिक अमेरिकेमध्ये बळी गलेल्यांची संख्या आहे.

Leave a Comment