देशातील कोरोनाग्रस्तांची धक्कादायक आकड्यांकडे वाटचाल; आतापर्यंत 681 लोकांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची धक्कादायक आकड्यांकडे वाटचाल सुरु असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 हजार 393वर पोहोचला आहे. आता एकूण 15 हजार 859 लोक उपचार घेत असून 3959 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 681 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या 24 तासात कोरोनामुळे 49 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 1489 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशात 15 हजार 859 कोरोनाबाधित लोकांवर उपचार सुरु आहेत, तर 3959 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार कोरोनाची लागण झालेल्यापैकी 19 टक्क्यांहून अधिक जण योग्य उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर देशातील कोरोनाबाधितांमध्ये 77 लोक परदेशी नागरिक आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त म्हणजे 5221 कोरोनाबाधित फक्त महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 2272, दिल्लीत 2156, राजस्थानमध्ये 1801, तामिळनाडू 1596 आणि मध्यप्रदेशात 1592 एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Comment