… तर अशा लोकांना केंद्र सरकारने 7500 रुपयांची मदत करावी – सोनिया गांधी


नवी दिल्ली : देशावर ओढावलेले कोरोना व्हायरसचे सकंट रौद्ररुप धारण करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ केली आहे. त्यातच या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या बंद ठेवाव्या लागल्यामुळे देशातील 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या आणि कामगारांच्या रोजगारावर गदा आली आणि पोट कसे भरायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असल्यामुळे केंद्र सरकारने अशा कुटुंबियांना 7500 रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.

सोनिया गांधी यावेळी लॉकडाऊन संदर्भात बोलताना केंद्र सरकारवर टीका करण्याची संधी गमावली नाही. सर्व गोष्टी केंद्र सरकारने अधिक गांभीर्याने घेणे आवश्यक असून यामध्ये केवळ कामगारच नाही तर अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सप्लाय चेनला अधिक चांगले तयार करणे आवश्यक आहे.

आम्ही केंद्र सरकारसाठी आमच्याकडून अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यामध्ये टेस्टिंग किट आणि टेस्टिंग क्षमता वाढवण्यात यावी. रँडम टेस्टिंग व्हावे, असे काही बदल सूचवण्यात आले होते. पण अद्यापही या गोष्टींची केंद्र सरकारकडून कमतरता भासत असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment