रमजान दरम्यान घरीच नमाज पठण करा : जामा मशिदीच्या शाही इमामांचे मुस्लिम बांधवांना आवाहन


नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांसह आपल्या देखील देशात कोरोना या जीवघेण्या व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला असल्यामुळे आगामी एक-दोन दिवसात मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानवर त्याचे सावट आहे. शुक्रवार, 24 एप्रिलपासून केरळमध्ये रमजान सुरू होत असल्याने या काळात मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करत, सोशल डिस्टंसिंग पाळावे असे आवाहन दिल्ली जामा मशिदीच्या इमामांकडून करण्यात आले आहे.

भारत सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन आपण केले तर देशातून कोरोना हा आजार लवकर संपवू शकतो, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. रमजानची धामधूम येत्या काही दिवसात असली तरीही घरीच रहा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम वेळोवेळी पाळा. यामुळेच सार्‍यांचे रक्षण होण्यास मदत होणार असल्याचा सल्ला त्यांनी देशातील मुस्लिम बांधवांना दिला आहे.

Leave a Comment