आता गुगल सर्चमध्ये बनवता येणार आवडत्या चित्रपट, शोजची वॉचलिस्ट

लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात कैद आहेत. अशा स्थितीत सर्वाधिक वापर मोबाईलचा होत आहे. त्यामुळे गुगल आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर लाँच करत आहे. आता गुगलने गुगल सर्च आणि अँड्राईड टिव्हीसाठी खास फीचर आणले आहेत.

गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये सांगितले की, गुगल सर्चमध्ये आता युजर्स वॉचलिस्टमध्ये चित्रपट आणि टिव्ही शोचा समावेश करू शकणार आहेत. युजर्सला गुगल सर्चमध्ये ‘What to watch’ असे सर्च केल्यावर, तेथे चित्रपट अथवा टिव्ही शो दिसतील. येथे युजरला वॉच्ड आणि वॉचलिस्ट असे पर्याय मिळतील. त्यानंतर युजर आवडत्या चित्रपट आणि टिव्ही शोचा वॉचलिस्टमध्ये समावेश करू शकतात अथवा वॉच्ड म्हणून मार्क करू शकतात. हे नवीन फीचर गुगल अ‍ॅपमध्ये मिळत आहे.

याआधी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात देखील हे फीचर आणले होते. मात्र ते मर्यादित ठिकाणी लाँच करण्यात आले होते.

Image Credited – NDTV

याशिवाय अँड्राईड टिव्हीसाठी देखील गुगलने खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. आता अँड्राईड टिव्हीमध्ये युट्यूबद्वारे वेगवेगळे तीन कंटेट दाखवण्यात येत आहेत. यामुळे युजर्सला वेगवेगळी माहिती मिळवणे आणि इंटरटेन्मेटसाठी सोपे होईल. पहिल्या ओळीत कोव्हिड-19 संदर्भात माहिती देणारे महत्त्वाच्या चॅनेल्स, दुसऱ्या ओळीत घरी असताना व्यायाम, कुकिंग सारख्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देणारे व्हिडीओ आणि तिसऱ्या ओळीत चित्रपट दिसतील.

Leave a Comment