कोरोनाविरोधातील लढाईसाठी मैदानात उतरल्या राष्ट्रपतींच्या सौभाग्यवती


नवी दिल्ली : संपूर्ण जगाभोवती कोरोना व्हायरसने आपला फार्स घट आवळण्यास सुरुवात केली असून कोरोना व्हायरसविरोधातील या लढाईत सर्वच जण आपापल्या परीने योगदान देत आहे. अशातच, कोरोना विरोधातील लढाईसाठी खुद्द भारताच्या राष्ट्रपतींची पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद यादेखील मैदानात उतरल्या आहेत. गरिबांसाठी त्या स्वतःच मास्क शिवत आहेत आणि कोरोनाचा धैर्याने सामना करण्याचा संदेश देत आहेत.


कोरोनाविरोधातील लढाईत बुधवारी देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद यांनी आपले योगदान दिले. त्यांनी प्रेसिडेंट इस्टेट येथील शक्ती हाट येथे स्वतःच्या हाताने मास्क शिवले. वैश्विक आणि राष्ट्रीय संकटांचा सामना एकत्र येऊनच केला जाऊ शकतो, हा संदेशही त्याच्या या योगदानातून लोकांपर्यंत जातो. दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाच्या विविध शेल्टर होम्सना येथे शिवण्यात येणारे मास्क वितरित केले जात आहेत.

Leave a Comment