कोरोना : स्टीफन हॉकिंग यांचा व्हेंटिलेटर कुटुंबाकडून हॉस्पिटलला दान

जगभरात सध्या कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. प्रत्येकजण आपआपल्या परीने या महामारीशी लढण्यासाठी मदत करत आहे. आता प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे कुटुंब देखील मदतीसाठी पुढे आले आहे.

या कुटुंबाने स्टीफन हॉकिंग यांच्या व्हेंटिलेटरला कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी लंडन येथील एका हॉस्पिटलला दान केले आहे. 2018 साली हॉकिंग यांचे निधन झाले होते.

हॉकिंग यांची मुलगी लूसी म्हणाल्या की, माझ्या वडिलांच्या व्हेंटिलेटरला कँब्रिज येथील रॉयल पापवर्थ हॉस्पिटलला देण्यात आलेले आहे. याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होत असे.

त्या म्हणाल्या की, व्हेंटिलेटरवर असल्याने रॉयल पापवर्थ माझ्या वडिलांसाठी खूपच महत्त्वाचे होते. व्हेंटिलेटर महामारीच्या काळात मदतीस येईल.

Leave a Comment