कोरोना : ब्रिटन, जर्मनीमध्ये लसीची मानवी चाचणी सुरू

कोरोना व्हायरसवर उपचारासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडे ब्रिटन आणि जर्मनीने लसीच्या मानवी चाचणीस सुरूवात केली आहे. सध्या जगभरात लसीबाबत 150 योजना सुरू आहेत. मात्र जर्मनी आणि ब्रिटनसह केवळ 5 देशांनाच क्लिनिकल चाचणीची परवानगी मिळाली आहे.

ब्रिटनची ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी 510 आणि जर्मनीची फेडरल इंस्टिट्यूट 200 निरोगी लोकांवर लसीची चाचणी करणार आहे. ज्या लोकांवर चाचणी केली जाणार आहे त्यांचे वय 18 ते 55 वयोगटातील आहे.  वेगवेगळ्या लोकांवर चाचणी करण्यात येईल, ज्यामुळे लस व्हायरस नष्ट करण्यास किती सक्षम आहे हे समजण्यास मदत होईल. या लसीद्वारे होणाऱ्या वाईट परिणांचे देखील परिक्षण केले जाईल.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांचे म्हणणे आहे की, ही लस कोरोना व्हायरसशी लढण्याचा एकमेवर उपाय आहे. या चाचणीसाठी लंडनच्या इंपेरियल कॉलेजला 2.25 कोटी पाऊंड निधी देण्यात आला आहे.

ऑक्सफोर्टचे संशोधक संचालक प्रोफेसर सारा गिल्बर्ट यांच्यानुसार, लस यशस्वी होण्याची 80 टक्के शक्यता आहे.

मात्र वैज्ञानिकांना भिती आहे की यामुळे काही चुकीचे झाले तर हजारो-लाखो लोकांवर परिणाम होऊ शकतो. लॅबच्या सुरक्षे व्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत.

दुसरीकडे जर्मनीची बायोटेक कंपनी बायो एन टेकने देखील लस तयार केली आहे. अमेरिकेची औषध कंपनी फायजरसोबत मिळून ही लस तयार करण्यात आली आहे. ज्याचे नाव बीएनटी 162 ठेवण्यात आलेले आहे. जर्मनीनंतर याची चाचणी अमेरिकेत होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment