चीनमधील आकडेवारीच्या 4 पट अधिक कोरोनाग्रस्त! संशोधकांचा दावा

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. मात्र चीन कोरोनाग्रस्तांचा आकडा लपवत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. आता हाँगकाँगच्या संशोधकांनी दावा केला आहे की, चीनमध्ये कोव्हिड-19 च्या पहिल्या लाटेत 2,32,000 लोकांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. हे अधिकृत आकड्यांच्या 4 पट अधिक आहे.

चीनमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 हजार असल्याचे सांगितले होते. मात्र हाँगकाँग यूनिवर्सिटी यूनिवर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांचा लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, सध्या कोव्हिड-19 ची जी व्याख्या केली जात आहे ती आधीपासूनच केली असती तर हे आकडे कितीतरी अधिक असते.

चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 83 हजारांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने 15 जानेवारी ते 3 मार्च या दरम्यान कोव्हिड-19 च्या सात वेगवेगळ्या परिभाषा केल्या आहेत. संशोधकांनुसार, या बदलांमुळेच वास्तविक आणि अधिकृत आकड्यांमध्ये मोठा बदल दिसून येत आहे.

हाँगकाँगच्या संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या वुहान मिशनमधील 20 फेब्रुवारी पर्यंतच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. यावरून अंदाज लावण्यात आला की सरकारने केलेल्या सुरूवातीच्या 4 बदलांमळे खरी आकडेवारी आणि देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये 2.8 वरून 7.9 पट वाढला.

संशोधनानुसार, जर पाचवी परिभाषा पहिल्यापासून अधिकाधिक चाचणीसोबत वापरण्यात आली असती तर 20 फेब्रुवारीपर्यंत आकडेवारी ही 2,32,000 असते. मात्र चीननुसार अधिकृत आकडेवारी 55,508 आहे.

चीन सुरूवातीला कोरोनाबाधित असताना कोणतीही लक्षण अथवा थोडीफार लक्षण असणाऱ्यांना अधिकृत आकड्यांमध्ये समावेश करत नसे. संशोधनामध्ये महामारीचा दर आणि याचा वेळ लक्षात घेता या बदलांदेखील ग्राह्य धरण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Comment