कोरोना : अमेरिकेने चीन विरोधात दाखल केला खटला

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने आता जगभरात थैमान घातले आहे. यामुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या व्हायरसची निर्मिती चीनच्या लॅबमध्ये झाल्याचा आरोप अमेरिकेने अनेकदा केला आहे.

याशिवाय चीनने जगाला या संबंधी माहिती देण्यास उशीर केल्याचे आणि यामुळे जागतिक मंदी आणि महामारीचे संकट आल्याचे देखील अमेरिकेने म्हटले आहे.

आता यावरून अमेरिकेतील एका राज्यातील न्यायालयात थेट चीनविरोधात खटलाच दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेच्या मिसौरी या राज्यात हा खटला दाखल करण्यात आला असून, अटॉर्नी जनरल एरिक स्कमिटने चीन सरकार, सत्ताधारी कम्यूनिस्ट पक्ष आणि संबंधित अधिकारी आणि संस्थांना या खटल्यात पक्ष बनवले आहे.

चीनवर आरोप लावण्यात आला आहे की त्यांनी कोरोना संक्रमणाबाबत लोकांपर्यंत माहिती पोहचू दिली नाही. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत महामारीचे स्वरूप आले. एवढेच नाहीतर वैद्यकीय संशोधनाची माहिती नष्ट केली व लाखो लोकांना या महामारीत ढकलले. सोबतच पीपीई किटचा साठा केला.

एरिक यांचे म्हणणे आहे की, कोव्हिड 19 मुळे संपुर्ण जगाचे नुकसान झाले आणि लाखो लोक संक्रमित झाले. अनेक कुटुंबानी नातेवाईकांना गमावले. व्यापार बंद झाले.

Leave a Comment