सोनू निगमच्या समर्थनात अदनान सामी आला पुढे

3 वर्षांपुर्वी अजान बाबत केलेल्या एका ट्विटमुळे गायक सोनू निगम पुन्हा चर्चेत आला आहे. लॉकडाऊनमुळे दुबईत अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची मागणी देखील काही नेटकरी करत आहे. मात्र सोनू निगमला अदनान सामीने पाठिंबा दिला आहे.

ट्विटरवर अदनान सामीने सोनू निगमसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांच्यातील मैत्रीचे नाते स्पष्ट दिसत आहे.

दुबईत अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची नेटकऱ्यांकडून मागणी

सोनूला पाठिंबा देत अदनान सामीने लिहिले की, जेथे सोनू निगमची गोष्ट आहे. त्याच्या गाण्याला विसरून जा. कारण ते अविश्सनीयरित्या सुंदर आहे. तो माझा खरा भाऊ आहे, ज्याने मला नेहमीच माझ्या बाजूने उभा होता आणि मला आपल्या माणसाप्रमाणे प्रेम दिले. एक गोष्ट मी व्यक्तीगतरित्या सांगू इच्छितो की, तो सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो. कृपया त्याला एकटे सोडा.

सोनू निगमला पाठिंबा दिल्याने सोशल मीडियावर अदनान सामीचे कौतूक होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सोनू निगमला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, सध्या लॉकडाऊनमुळे सोनू निगम कुटुंबासह दुबईमध्ये अडकला आहे.

Leave a Comment