दुबईत अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची नेटकऱ्यांकडून मागणी

बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या आपल्या कुटुंबासोबत लॉकडाऊनमुळे दुबईत अडकला आहे. याबाबतची माहिती स्वतः सोनू निगमने सोशल मीडियाद्वारे दिली होती. मात्र एका जुन्या वादामुळे सोनू निगम चर्चेत आला आहे. 3 वर्षांपुर्वी केलेल्या ट्विटमुळे सोनू निगमला अटक करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

जवळपास 3 वर्षांपुर्वी सोनू निगमने अजानच्या आवाजाचा त्रास होत असल्याचे ट्विट केले होते. आता यावर नेटकरी प्रश्न विचारत आहेत की, आता दुबईमध्ये अडकले असताना अजानच्या आवाजाचा त्रास होत नाही का ?

अजानमुळे सकाळची झोप मोड होत असल्याचे ट्विट त्याने केले होते. या वरून त्याला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा त्याच्या 3 वर्षांपुर्वीच्या ट्विटचे स्क्रीनशॉट पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ragingBULL3x/status/1252508157735325698

आता नेटकरी सोनू निगम दुबईत असल्याने त्याच्या अटकेची मागणी करत आहे. धार्मिक भावना दुखावल्या असून, दुबई पोलिसांनी त्याच्या समस्येचे समाधान करावे, अशी मागणी नेटकरी करत आहेत.

2017 साली केलेल्या या ट्विटनंतर सोनू निगमने आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले होते. शिवाय त्याने मुंडन देखील केले होते.

Leave a Comment