लॉकडाऊनमध्ये सुरू होणार ही दुकाने, सरकारने दिली सूट

कोरोना व्हायरसमुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र आता सरकार कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांमध्ये हळूहळू काही गोष्टींसाठी सूट देत आहे. आता सरकारने शाळा, कॉलेजच्या पुस्तकांची दुकाने, इलेक्ट्रिक फॅन्सची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

याशिवाय घरातील आजारी वृद्ध लोकांसाठी सेवा, प्रीपेड मोबाईल रिजार्ज, ब्रेड फॅक्ट्रीस, दूध प्रोसेसिंग यूनिट, पीठाच्या गिरणी शहरी भागात सुरू करण्यास परवानगी आहे.

शेतीसंबंधी बियाणे, फलोत्पादन आणि संशोधन या संदर्भातील आयात-निर्यातीला नवीन नियमांमध्ये सूट दिली आहे. वन अधिकारी, वन-वृक्षारोपण,  संबंधित कामे, मधासंबंधीत उत्पादनांना आंतरराज्य वाहतुकीस परवानगी आहे.

मात्र असे असताना देखील कार्यालय, वर्कशॉप, फॅक्ट्रीस इत्यादी ठिकाणी कामे करताना सोशल डिस्टेंसिंग पाळणे आणि योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सरकारने सांगितले आहे. याशिवाय लॉकडाऊनमध्ये ही सूट केवळ कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांमध्येच मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment