कोरोना : या देशात 5 उपराष्ट्रपती, मात्र वेंटिलेटर्सची संख्या फक्त 4

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. काही देशांमध्ये आरोग्य व्यवस्था देखील नसल्याने तेथील परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. आफ्रिकेतील देशांची परिस्थिती आणखीनच गंभीर आहे, कारण तेथे आरोग्य व्यवस्थेची स्थिती खूपच खराब आहे. यातील काही देशांकडे वेंटिलेटर्स देखील नाहीत.

दक्षिण सुदान असाच एक देश असून, येथे आरोग्य व्यवस्थेची मुलभूत सुविधा देखील नाही. या देशात 5 उपराष्ट्रपती आहेत, मात्र वेंटिलेटर्सची संख्या केवळ 4 आहे. दक्षिण सुदानची लोकसंख्या 1.2 कोटी आहे. म्हणजे जवळपास 30 लाख लोकांसाठी एक वेंटिलटर आहे. दक्षिण सुदानमध्ये आयसीयूची संख्या 24 आहे.

इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटीनुसार (आयआरसी), सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिकनची संख्या 50 लाख असून, येथे केवळ 3 वेंटिलेटर्स आहेत. लायबेरियाची लोकसंख्या 49 लाख असून, तेथील वेंटिलेटर्सची संख्या 6 आहे. ज्यातील एकाचा वापर अमेरिकन दूतावास देखील करते.

आयआरसीनुसार, 10 आफ्रिकी देशांकडे एकही वेंटिलेटर्स नाही. तर 41 आफ्रिकन देशांकडे केवळ 2 हजार वेंटिलेटर्स आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोनाग्रस्त 5 पैकी एका व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. मात्र या देशात आरोग्याच्या मुलभूत सुविधा नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आफ्रिकी खंडात 5 हजारांपेक्षा कमी आयसीयू आहेत. यानुसार, प्रत्येकी 10 लाख लोकांमागे 5 बेड आहेत. तर यूरोपमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 4 हजार आयसीयू आहेत.

Leave a Comment