व्हायरल : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांचे पोलिसांकडून औंक्षण

सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. मात्र असे असताना देखील काहीजण विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. अशा नागरिकांना पोलीस देखील हटके पद्धतीने शिक्षा आणि समज देत आहेत.

ठाण्यात अशाच प्रकारे लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांची पोलिसांनी चक्क आरतीच ओवाळली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांची आरती करत आहे. तर इतर कर्मचारी टाळ्या वाजवत आरती म्हणत आहे. हे सर्व नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते.

नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी सध्या पोलीस विविध हटके कल्पना शोधून काढत आहेत. काही दिवसांपुर्वीच छत्तीसगडमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात पोलीस लॉकडाऊन मोडणाऱ्यांची आरती करत आहेत व टिळा लावत होते.

Leave a Comment