अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी रोहित शेट्टीने केली आठ हॉटेल्सची व्यवस्था


ज्यावेळी आपल्यावर कोणतेही संकट येते त्यावेळी आपल्या सुरक्षेसाठी कायम पोलीसच धावून येतात. पण आता याच पोलिसांच्या मदतीला बॉलीवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी धावून आला आहे. रोहित शेट्टीने कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांसाठी शहरभरात आठ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्या या मदतीसाठी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत.


ऑन-ड्युटी पोलिसांना या हॉटेल्समध्ये थोडा वेळ आराम करता येणार आहे. हे हॉटेल्स आंघोळ किंवा कपडे बदलण्यासाठीही सोयीस्कर ठरतील. त्यांना तेथे नाश्ता व जेवणसुद्धा देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यात आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यात आम्हाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत मुंबई पोलिसांनी त्याचे आभार मानले आहेत. रोहितच्या या कामाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Comment