पालघर प्रकरण; राख रांगोळी होईल ठाकरे सरकारची


भोपाळ – महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या मॉब लिचिंगच्या प्रकरणानंतर देशातील संत समाज संतप्त झाला आहे. सतत हत्येच्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची संत समाज मागणी करत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी या हत्येप्रकरणी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

उमा भारती यांनी ट्विट करून लिहिले आहे की, संतांची हत्या केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकारची राखरांगोळी होईल. उमा भारती यांनी सोमवारी सायंकाळी पालघर घटनेवर सलग पाच ट्विट केले. त्यांनी लिहिले, महाराष्ट्रातील पालघरमध्ये संतांची निर्दयी हत्या, ज्यापैकी एक संत 70 वर्षांचा होता, हे अत्यंत भयानक आणि विवेकबुद्धीला दुखविणारे आहे. व्हिडीओमध्ये गुन्हेगार स्पष्ट दिसत आहेत, पोलिस असूनही हा गुन्हा झाला आहे, तिथे उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे.

उमा भारती यांनी पुढे लिहिले की फास्ट ट्रॅक कोर्टात सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळण्याची प्रक्रिया केली जावी. या महान संतांना ठार मारल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारची राखरांगोळी होईल असे दिसते. जुन्या आखाड्याशी माझे जवळचे नाते आहे. मी ही घटना कधीही विसरणार नाही. संपूर्ण देशाने या घटनेचा निषेध करायला हवा.

संत समुदायाला आवाहन करीत उमा भारती यांनी लिहिले की, मी देशातील सर्व साधूंना त्या महान संतांच्या आत्म्यासाठी आणि या महान भिक्षूच्या प्रायश्चित्तासाठी जिथे आहात तिथेच उपवास करण्याचे आवाहन करते.

महाराष्ट्रातील पालघरमध्ये घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर ठाकरे सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचे सरकार कोणत्याही दोषीला सोडणार नाही, लोकांनी हा विषय भडकवण्याचा प्रयत्न करू नये.

Leave a Comment