मुंबई भकास बनविण्याला आर्किटेक्ट आणि विकासक जबाबदार


मुंबई : विकासाच्या नावाखाली मुंबईतील बिल्डर आणि आर्किटेक्ट झोपडपट्टी उभारत असून लोकांना ज्या ठिकाणी योग्य वातावरण मिळत नसल्यामुळे मुंबईचे नियोजन बिघडले आहे. शहरांमध्ये बांधकाम व्यावसायिकांना अशा झोपडपट्ट्या तयार करताना लाज वाटायला हवी होती. येथील बिल्डर आणि आर्किटेक्ट या परिस्थितीला जबाबदार असल्याचे परखड मत उद्योगपती रतन टाटा यांनी एका वेबिनारमध्ये मांडले. कोरोनाची आज मुंबईत जी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, या झोपडपट्टया त्याला जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रतन टाटा जगभरातील कॉर्पोरेट आणि स्टार्टअप व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या कॉर्पजिनीतर्फे आयोजित वर्च्युअल परिसंवादात सोमवारी भाग घेताना बोलत होते. पाच हजारांहुन अधिक प्रेक्षक या परिसंवादात सहभागी झाल्याचे कॉर्पजिनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत जैन सांगितले. वास्तुरचनाकार आणि विकासक म्हणून आपल्यावर एक सामाजिक जबाबदारी असल्यामुळे आपल्याला अशी कामे करताना लाज वाटली पाहिजे, असेही टाटा यांनी म्हटले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी खुद्द रतन टाटा आणि टाटा समूहाने सरकारला 1500 कोटींची मदत केली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या लढाईत काम करणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी आपली पंचतारांकित हॉटेल्स खुली केली आहेत.

आज शहरात पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर, आर्किटेक्ट उंचच उंच उभ्या झोपड्याच उभारत आहेत. नागरिकांना ज्यात मोकळे वातावरण मिळत नसल्याचे टाटा यांनी सांगितले. झोपडपट्ट्या ज्या ठिकाणी वसल्या आहेत तिथे पुनर्विकासातून विकासकांनी प्रचंड पैसा कमावला. पण शहराचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहे. आता कोरोनामुळे कमी किमती निर्माण झालेल्या झोपडपट्ट्यांची खरी बाजू समोर आली आहे. जवळपास 10 लाख झोपड्या धारावी सारख्या देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत आहेत. जवळपास पंधरा लाखाच्या आसपास लोक याठिकाणी राहतात. या धारावीत आता कोरोनाचे हॉटस्पॉट निर्माण झाल्याने अधिकच धोका निर्माण झाला आहे.

Leave a Comment