सावधान ! गुगलवर कोरोनाचा उपचार शोधणे पडू शकते महागात

आज आपण प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी, उत्तर शोधण्यासाठी गुगलवर सर्च करत असतो. एवढेच नाहीतर आजारावरील उपचार, औषधे देखील गुगलवर सर्च करण्यात येत आहे. मात्र आजारावरील उपचार गुगलवर शोधणे जीवघेणे देखील ठरू शकते.

अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत, ज्यात गुगलवर औषध शोधण्याच्या नादात तब्येत अधिक खराब झाली आहे. सध्या जगभरात कोरोनाचा प्रसार सुरू असताना अनेकजण यासंबंधी औषध गुगलवर सर्च करत आहेत. कोरोना व्हायरस सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. मात्र याचा फायदा ई-कॉमर्स आणि फार्मा कंपन्या उचलत आहेत.

गुगल आणि सोशल मीडियावर कोरोना व्हायरसवरील अनेक उपचार आढळतील, मात्र ही सर्व खोटी माहिती आहे. अनेक वेब लिंक्सवर गोमूत्र, क्लोरोक्वीन, कोलाइडल, स्लिवर, विटामिन आणि चहाने कोरोना बरा होतो असे दावे आढळतील. अनेक फार्मा कंपन्या देखील बनावट होम चाचणी किट देखील विकत आहे.

ही चुकीची माहिती महागात पडू शकते व कधीकधी यामुळे अधिक आजारी पडण्याचा धोका असतो. सरकार वारंवार या खोट्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप उपचार अथवा लस उपलब्ध नाही, त्यामुळे अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेऊ नये.

Leave a Comment