राष्ट्रपती भवन परिसरात सापडला कोरोनाग्रस्त

देशात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता राष्ट्रपती भवनात देखील आता कोरोनाने शिरकाव केला आहे. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आरोग्य मंत्रालयाने 125 कुटुंबाना सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे.

चितेंची बाब म्हणजे महिलेचा पती राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या अंडर सेक्रेटरी स्तरावरील आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात काम करत होता. त्यामुळे या अधिकाऱ्याने देखील स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.

अमरउजालाच्या वृत्तानुसार, राष्ट्रपती भवन परिसरात ज्या महिलेला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्या महिलेच्या सासूचा काही दिवसांपुर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सासूच्या संपर्कात आल्याने महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर महिला आणि तिच्या कुटुंबाला क्वांरटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. महिलेच्या मुलीमध्ये देखील कोरोनाची लक्षण दिसले होते, मात्र तिचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

Leave a Comment