फुफ्फुसच नाही तर शरीरातील या अंगांना देखील निकामी करतो कोरोना

कोरोना व्हायरस मनुष्याच्या श्वसन प्रणालीला निकामी करून त्याला मृत्यूजवळ नेतो. मात्र श्वसन तंत्रा व्यतिरिक्त शरीरातील अन्य भागांवर देखील कोरोनाचा गंभीर परिणाम होतो. दी लिसेंटच्या रिपोर्टमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, कोव्हिड-19 रक्त वाहिन्यांवर हल्ला करत शरीरातील अनेक मुख्य अंगाना नुकसान पोहचवते.

ज्यूरिक यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधक फ्रँक रुचित्जका यांच्यानुसार, कोरोना फुफ्फुसासोबत शरीराच्या प्रत्येक भागात रक्त वाहिन्यांद्वारे हल्ला करतो. हा व्हायरस निमोनियापेक्षा अधिक धोकादायक आहे. हा व्हायरस रक्त पेशींसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करणाऱ्या एंडोथीलियम थराच्या आत जावू शकतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

यानंतर शरीरातील वेगवेगळ्या भागात रक्त प्रवाह हळू होतो. रक्त प्रवाह कमी झाल्याने ह्रदय, किडनी आणि इन्टेस्टाइन सारख्या शरीरातील भागांवर परिणाम पाहण्यास मिळतो.

रुचिज्तका यांच्यानुसार, हायपरटेंशन, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह आणि लठ्ठपणा सारखे गंभीर आजार असणारे लोक कोरोना व्हायरसचा शिकार मोठ्या प्रमाणात होतात. अशा स्थितीत एंडोथीलियम थर कमकुवत होऊ शकतो व व्हायरस सहज हल्ला करतो.

त्यांनी सांगितले की, तीन असे प्रकरण पाहिले ज्यात रुग्णाची ब्लड वेसेल्स लायनिंग व्हायरसने भरलेली होती. यामुळे शरीरातील अनेक अंग खराब झाले होते.

हायपरटेंशनने ग्रस्त 71 वर्षीय व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात अडकल्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक अंग निकामी झाले. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारेच एका 58 वर्षीय व्यक्तीला मधुमेह, हायपरटेंशन आणि लठ्ठपणाची समस्या होती. त्यांच्या शरीरातील लहान आतड्यांचा रक्त प्रवाह हळू झाल्याने फुफ्फुस, ह्रदय, किडनी आणि लिव्हर देखील खराब झाले.

Leave a Comment