पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील 25 कर्मचारी कोरानाग्रस्त


पुणे – राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यातच आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या 25 कर्मचाऱ्यांमध्ये 19 परिचारिकांचा समावेश असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अद्यापही वाढ होतच आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यात 472 नवे कोरोनाग्रस्त आढळले असुन राज्यातील एकूण रुग्ण संख्या 4 हजार 676 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. याबरोबरच आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 232 वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment